`ठग्स ऑफ हिंदोस्तान`मधील आमीर खानचा हा लूक होतोय व्हायरल
जेव्हा अभिनेता एखाद्या खास लूकमध्ये चित्रपटात झळकणार असतो तेव्हा शक्य तेवढे दिवस त्याचा लूक मीडियापासून लपवला जातो.
मुंबई : जेव्हा अभिनेता एखाद्या खास लूकमध्ये चित्रपटात झळकणार असतो तेव्हा शक्य तेवढे दिवस त्याचा लूक मीडियापासून लपवला जातो.
काही गोष्टी आयत्या वेळेस रसिकांसमोर आल्या तर अधिक प्रभावशाली ठरतात. पण आजकाल सोशल मीडियावर सार्याच गोष्टी वार्यासारख्या पसरत असल्याने नकळत काही फोटो लीक होतात.
' ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातील आमीर खानच्या लूक बाबातही असेच काहीसे झाले आहे. त्याचा खास लूक इंस्टाग्रामवर लीक झाला आहे. अशी चर्चा आहे.
कुरळ्या केसांचा, चेहर्यावर जखमा आणि माती असलेल्या, मळलेल्या कपड्यांमधील आमीर खान ओळखता येणं शक्य नाही. चित्रपटाच्या सेटवरील आमीरचा हा फोटो त्याच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये आमीरचा बॉडीगार्डदेखील दिसत आहे.
यश राज फिल्म्सच्या आगामी ' ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या शूटिंगला आमीर खानने सुरूवात केली आहे. आमीर सोबत या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे शहेनशहा अमिमाभ बच्चन, अभिनेत्री कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख झळकणार आहेत.
अमिताभ बच्चन आणि आमीर खान हे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या प्रोजेक्टबाबत आणि अमिताभ बच्चन सोबत काम करायला मिळणार यामुळे आमीरही खूप उत्सुक आहे.