मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे ओळखले जातात. यामध्ये त्या कलारांच्या मतांचा आणि त्यांच्या वेगळेपणाचाही समावेश होतो. अशाच साचात बसणारी एक अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून फक्त तामिळ, मल्याळमच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही साई पल्लवी. सध्या ती चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या एका निर्णायामुळे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलुगू चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला अशा चर्चा आहेत, की साई पल्लवीला विजय देवेरकोंडा या अभिनेत्याची भूमिका असणाऱ्या आगामी चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. पण, चित्रपटात लिपलॉक सीन अर्थात चुंबनदृश्य असल्यामुळे साईने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवेरकोंडा याचा 'डिअर क़ॉमरेड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून तो अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पण, रश्मिकाआधी या चित्रपटासाठी अभिनेत्री साई पल्लवी हिला विचारण्यात आलं होतं. पण, चुंबनदृश्याच्या कारणामुळे तिने या चित्रपटाचा प्रस्ताव नाकारला. काही दिवसांपूर्वीच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यामध्येही हे दृश्य दाखवणयात आलं आहे. 



'आयबीटाईम्स'च्या वृत्तानुसार साई पल्लवीने या चित्रपटात लिपलॉक आणि कोणत्याही प्रकारचं इंटिमेट दृश्य साकारण्यास हरकत दर्शवली होती. परिणामी या चित्रपटासाठीचा प्रस्ताव अभिनेत्री रश्मिकासमोर ठेवण्यात आला.



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, खुद्द विजयनेही याविषयी प्रतिक्रिया दिली. आपल्याला लिपलॉक या शब्दावरच हरकत आहे. ज्या पद्धतीने तो लिहिला जातो तेसुद्धा चुकीचं आहे, असं मत त्याने मांडलं. 'डिअर कॉमरेड' हा चित्रपट 'सीआयए' या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.