कतरिना कैफच्या बहिणीचा First Look पाहिलात का?
कतरिनाच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण.
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेकांना तिच्या हटके अंदाजाने घायाळ केलं. कतरिनानंतर तिची बहिण इसाबेल कैफने (Isabelle Kaif) देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. इसाबेलचा पहिल्या 'सुस्वागतम खुशामदीद' (Suswagatam Khushaamadeed) सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. सिनेमाचा पहिला लूक चाहत्यांना चांगलाचं भावला होता. सिनेमाची रीलिज डेट देखील अंतिम करण्यात आली आहे. या पहिल्या सिनेमानंतर तिच्या हाती दुसरा सिनेमा देखील लागला आहे. 'टाईम टू डांस' (Time To Dance) असं सिनेमाचं नाव आहे. इसाबेल अभिनेता सुरज पंचोलीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
इसाबेल आणि सुरज पंचोलीचा आगामी सिनेमा रूपेरी पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. दोघांनी देखील सिनेमाचा फर्स्टलूक सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या दोघांचेही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघेही प्रोफेशनल डान्सर दिसत आहेत.
'टाइम टू डांस' सिनेमा नेटफ्लिक्सवर 12 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता इसाबेल प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून प्रेक्षकांच्या मनात इतर अभिनेत्रींप्रमाणे वर्चस्व प्रस्थापित करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'सुस्वागतम खुशामदीद' चित्रपटामध्ये ती अभिनेता पुवकित सम्राटसोबत रोमांस करताना दिसणार आहे. याआधी इसाबेल 'माशाल्लाह' या म्यूझीक व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती.