सावत्र भावांसोबतच्या नात्यावर ईशा देओलचं सूचक वक्तव्य; पहिल्यांदाच उघडपणे म्हणाली...
सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. सध्या `गदर २` या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगला गाजला आहे. त्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर फक्त आणि फक्त `गदर`चीच चर्चा होती. आता चर्चा आहे ती म्हणजे ईशा देओल हिची. आपल्या सावत्र भांवडांसोबतही ईशा देओसचे चांगले संबंध आहेत. सोबतच `गदर 2` या चित्रपटादरम्यान ही सर्वच भावंडं एकत्र आली होती. यावेळी ईशा देओलचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या सावत्र भावंडांच्या नात्यावर खुलासा केला आहे.
Isha Deol On Sunny Deol and Bobby Deol: अभिनेत्री ईशा देओल ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिनं आपल्या सावत्र भावांच्या नात्यावर खुलासा केला आहे. 'गदर 2' पाहायला खासकरून ती आपल्या भावाला शुभेच्छा द्यायला आली होती. त्यांचे फोटोही सोशल मी़डियावर हे चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यांच्यातील नात्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यामुळे आताही त्यांची जोरात चर्चा रंगलेली दिसते. यावेळी ईशानं काही गोष्टी उघड न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणाली की शक्यतो ती कुठल्याच गोष्टी उघड करणार नाहीये. त्यामुळे यावेळी तिची जोरदार चर्चा रंगलेली आहे.
यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे हेही आपण जाणून घेऊया. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली आहे की, ''काही गोष्टी या अशा आहेत, ज्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. मी काही बोलणार नाही. कोणीही मला कितीही समजवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी काही गोष्टींबद्दल काहीच बोलणार नाही. ती म्हणाली की, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी वडिलांचे आभार मानते.'' पुढे ती म्हणाली की आपल्या सावत्र भांवडांसोबतच्या नात्यातलं प्रेम हे आपल्या वडिलांपासून आले आहे. आमचे वडिल हे एक खूप चांगलं व्यक्तिमत्त्व आहे आणि आम्ही त्यांचीच मुलं आहोत. आम्ही त्यांचा वारसा हा पुढे नेतो आहोत आणि त्याचसोबत आमच्या वडिलांना लोकांचे प्रेम मिळते आहे म्हणूनच आम्हालाही प्रेम मिळते आहे.
सनी देओल आणि ईशा देओल यांच्या नात्याविषयी अनेकदा चर्चा रंगलेली असते. 'वर्षभरापुर्वी सर्वांना वाटायचं की आयुष्य हे फारच सुरूळीत सुरू आहे. पण असं काहीही होत नाही. वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतात आणि त्या बदलेल्या गोष्टींप्रमाणे आपण वागायलाही हवं.', असं ईशा देओल म्हणाली होती. 'त्यातून नकारात्मक उर्जेपेक्षा आनंदी राहायला हवं', असं सनी देओल म्हणाले होते.
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केले आहे. त्यामुळे त्यांनी अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांना दोन मुलीही आहेत. सनी देओल आणि ईशा देओल यांचेही संबंध चांगलेच आहेत. ते यावेळी एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. दोन्ही बहीणींनी सनी देओलच्या चित्रपटाचे कौतुक केले होते.