`हाताला जोरात धरला अन्...`, ईशा कोप्पिकरने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Isha Koppikar Casting Couch : ईशा कोप्पिकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Isha Koppikar Casting Couch : अभिनेत्री ईशा कोप्पिकर ही 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखली जाते. पण ईशा ही सध्या मोठ्या पडद्यावरून गायब झाली आहे. कधी ईशा ही तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत असायची आणि काही दिवसांपूर्वी ईशानं पती टिम्मी नारंगपासून घटस्फोट घेतला. त्यामुळे ती चर्चेत आली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशानं कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी ईशा ही कास्टिंग काऊचचा शिकार झाली होती.
ईशा कोप्पिकरनं नुकतीच ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिली आहे. या मुलाखतीत ईशा कोप्पिकर तिला आलेल्या अनुभवाविषयी सांगताना म्हणाली, 'मी जेव्हा 18 वर्षांची होते. तेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्यानं आणि त्याच्या सेक्रेटरीनं मला काऊचसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की कामासाठी तुला अभिनेत्यासोबत जवळीक साधावी लागेल. अभिनेत्याचे सेक्रेटरी देखील चुकीच्या पद्धतीनं स्पर्ष करायचे. हाताला जोरात धरून ते म्हणाचे की तुला अभिनेत्यासोबत मैत्री करावीच लागेल.'
याविषयी सांगत ईशा पुढे म्हणाली की 'मी 23 वर्षांची असताना एका अभिनेत्यानं मला एकटं येण्यास सांगितलं. त्यावेळी त्या अभिनेत्याचे इतर अभिनेत्रींसोबत संबंध असल्याच्या देखील अफवा सुरु होत्या. त्याविषयी सविस्तर सांगताना ईशा म्हणाली, तो मला म्हणाला की माझ्याबाबतीत आधीपासूनच चर्चा आहेत आणि अफवा पसरत आहेत. पण मी त्याला भेटण्यास नकार दिला. मी एकटी येणार नाही असं मी त्याला स्पष्ट सांगितलं. तर तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला मोठा स्टार आहे.'
ईशा कोप्पिकर पुढे याविषयी सांगत भावूक झाली आणि म्हणाली की 'मी इतकी साधी आहे की एकदा एकता कपूरनं मला थोडा अॅटिट्यूड ठेव असा सल्ला दिला होता. त्याकाळी अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. अशा खूप कमी मुली आहेत ज्या इंडस्ट्रीत टिकून राहिल्या आहेत, अनेक मुलींनी तर हार मानली. तर टिकून राहिलेल्या मुलींपैकी ती एक आहे.'
हेही वाचा : VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा 'नवरा हाच हवा…' गाण्यावरचा डान्स पाहिलात का?
ईशा कोप्पिकरनं 'फिजा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी तिनं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. 'डरना मना है', 'पिंजर', 'एलओसी कारगिल' आणि 'कृष्णा कॉटेज' सारख्या चित्रपटांमध्ये ईशानं काम केलं आहे. त्याशिवाय ईशानं तिच्या करिअरमध्ये आयटम सॉन्ग देखील केले आहेत. ज्यात 'खल्लास' आणि 'इश्क समंदर' सारखी गाणी आहेत.