VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा 'नवरा हाच हवा…' गाण्यावरचा डान्स पाहिलात का?

Aishwarya And Avinash Narkar Dance On Navara Hach Hava : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या 'नवरा हाच हवा…' गाण्यावरच्या डान्सची चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2024, 05:13 PM IST
VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा 'नवरा हाच हवा…' गाण्यावरचा डान्स पाहिलात का?  title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya And Avinash Narkar Dance On Navara Hach Hava : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ झी मराठीवरील ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अकडलेल्या अक्षरा-अधिपतीच्या सुखी संसाराला पाहण्यासाठी सगळेच आतुर होते. सध्या या मालिकेत अक्षरानं अधिपतीला तिच्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिल्याचे आपण पाहिले. आता मालिकेत वटपोर्णिमेसाठी एक विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी 'नवरा हाच हवा…' हे खास गाणं चित्रित करण्यात आलं असून ते सध्या चांगलंच व्हायरल होतंय.

आता या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी देखील थिरकताना दिसत आहेत. त्यात सध्या व्हायरल होतोय तो व्हिडीओ म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तर नारकर जोडप्यानं देखील या गाण्यावर नेहमी प्रमाणे चांगला डान्स केला आहे. ऐश्वर्या यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे तर अविनाश यांनी जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, '36 गुणी जोडी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बेस्ट कपल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही नेहमीच माझे आवडतं कपल असाल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'लाल साडीत खूप छान दिसता आणि एव्हरग्रीन सर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आम्हाला याच जन्मी बरा पुढल्याजन्मी नको जिंदगी परत नर्क होईल आमचा नवरा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुमच्या दोघांचे हावभाव खूप सुंदर असतात.' तर काही नेटकऱ्यांनी त्यांना वटपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेविषयी बोलायचं झालं तर सध्या अक्षरा आणि अधिपतीचं लग्न वर्षभरापूर्वी त्यांच्या इच्छे विरोधात झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्यात दुरावा हा असतोच. आता कुठे जाणून त्यांच्यात सगळं ठीक होत असताना. त्यांना वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरी सतत प्रयत्न करताना दिसते. त्यांच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी अक्षरा आणि अधिपतीला घराबाहेर काढते. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की अक्षरा-अधिपती पुढचे 10 दिवस कसा संसार करणार? तर दुसरीकडे त्यातही हा प्रश्न उपस्थित आहे की चारुहास त्यांना कोणत्या प्रकारे मदत करणार की नाही? त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला झी मराठीवर रात्री 8 वाजता ही मालिका पाहावी लागेल.