मुंबई : ईरानी फिल्ममेकर माजिद मजीदीच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पृष्ठभूमीवर आधारित सिनेमा बियॉन्ड द क्लाऊड्स चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. या सिनेमात शाहिद कपूरचा भाई ईशान खट्टर अभिनेत्री मालविका मोहननसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बहिण - भावाच्या प्रेमळ नात्यावर हा सिनेमा आहे. 


सिनेमांत ईशानचं नाव आमिर 


बियॉन्ड द क्लाऊडमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार ईशान. ईशानचं या सिनेमांत नाव आमिर आहे. ट्रेलरच्या सुरूवातीलाच ईशान म्हणतो की, मी छोटो होतो जेव्हा माझे आई - वडिल कार अपघातात गेले. 13 वर्षाचा होतो जेव्हा मला मोठं माणूस व्हायचं होतं. ट्रेलरमध्ये अगदी सहज दिसतंय की, ईशानची स्वप्न मोठी असतात. ट्रेलरमध्ये ईशानचा लूक खूप रफ अॅण्ड टफ आहे. ट्रेलरमध्ये ईशान बोलतो की, तू क्या समझेगा प्यार क्या चीज है. 



धडक सिनेमांत दिसणार जान्हवीसोबत दिसणार 


या सिनेमानंतर ईशान श्रीदेवीच्या जान्हवी कपूरच्या धडक या सिनेमांत दिसणार आहे. जान्हवी या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. करण जोहर या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून सैराट सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.