Beyond The Clouds चा धमाकेदार ट्रेलर
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा सिनेमा `बियॉन्ड द क्लाऊड्स` लवकरच प्रदर्शित होणार आहे. ईशान या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत ईशानसोबत थिएटर आर्टिस्ट मालविका मोहनन देखील पाहायला मिळणार आहे. काही वेळेपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ईशान खट्टरच्या गोष्टीला दाखवण्यात आलं आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता मानविकाची गोष्ट दाखवली जात आहे. या सिनेमांच ईशान खट्टरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ईशानचा दोन्ही लूक पाहायला मिळत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा सिनेमा 'बियॉन्ड द क्लाऊड्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ईशान या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत ईशानसोबत थिएटर आर्टिस्ट मालविका मोहनन देखील पाहायला मिळणार आहे. काही वेळेपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ईशान खट्टरच्या गोष्टीला दाखवण्यात आलं आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता मानविकाची गोष्ट दाखवली जात आहे. या सिनेमांच ईशान खट्टरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ईशानचा दोन्ही लूक पाहायला मिळत आहे.
ईशान या सिनेमातून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
या सिनेमांत ईशान आणि मालविका बहिण - भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. मालविका या सिनेमांत ईशानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारत आहे. कोणत्यातरी कारणामुळे तिला जेलमध्ये जावे लागतं. यानंतर ईशान आपल्या बहिणीला बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न करतो हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. सिनेमांत दोघांच कॅरेक्टर स्लम परिसरातील दाखवण्यात आलं आहे. ज्यांचं आयुष्य अगदी लगेच बदलून जातं. आता पाहा या सिनेमाचा ट्रेलर
या सिनेमाची निर्मिती इरानी दिग्दर्शक माजिद मजिदीने केलं आहे. ही माजिद मजिदीचा हा पहिला भारतीय सिनेमा आहे. या सिनेमाचं संगीत ए आर रहमान यांनी केलं असून हिंदी डायलॉग विशाल भारद्वाज यांनी लिहीलं आहे. असं म्हटलं जातं की, या सिनेमाचं प्रिमियर लंडनमधील बीएफआय फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आलं होतं. ज्यानंतर गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये याचं प्रिमिअर झालं. हा सिनेमा 20 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.