मुंबई : आयुष्य हे अतिशय अस्थिर आहे. कधी कोणती घटना घडेल याचा काही नेम नाही. आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत गोव्याला गेलेल्या 25 वर्षीय अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिंदी आणि मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू झाला आहे. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 5.30 च्या सुमारास गोव्यात अपघाती मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आपला मित्र आणि होणारा भावी पती शुमग दाडगेसोबत गोव्यात फिरायला गेली होती. पुढच्या आठवड्यात हे दोघं साखरपुडा करणार होते. मात्र त्या दोघांचा करूण अंत झाला. 



गोव्यातील अरपोरा परिसरातील दरीत शुभमचा कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला. नियंत्रण सुटल्यानंतर कार दरीत कोसळली. गाडी खाडीत गेली. गाडी लॉक झाली. लॉक झाल्याने दोघेही गाडीत अडकले. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेलं. यामुळे दोघांचा मृत्यू झाला.  ईश्वरी-शुभम अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पुढच्या वर्षी दोघं साखरपुडा करणार होते. यापूर्वी हे दोघं फिरायला गेले होते. तेव्हाच त्यांचा करूण अंत झाला आहे. 


अभिनेत्री ईश्वरी देशपांडेबाबत माहिती 



ईश्वरी देशपांडेने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तिने एका आगामी चित्रपटातही काम केल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र आपला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अशा प्रकारे दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


ईश्वरी आणि शुभम करणार होते साखरपुडा



ईश्वरी आणि शुभम गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झाल्याने ते गेले काही महिने एकमेकांना डेट करत होते. पुढच्या आठवड्यात ईश्वरी आणि शुभम साखरपुडा करणार होते. मात्र त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.