Nushrat Bharucha Stuck in Israel : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. अशा परिस्थितीत अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश होता. शनिवारपासून तिच्या टीमशी कोणताही संबंध झाला नव्हता. अखेर संपर्क झाला असून अभिनेत्री नुसरत भरुचा सुरक्षित असून ती लवकरच भारतात परतणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाच्या टिमने सांगितले होते की, दुर्दैवाने इस्राईलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यानंतर तेथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर नुसरत तिथेच अडकली होती. यानंतर तिच्याशी संपर्कही झाला नव्हता. पण अखेर संपर्क झा आहे. 


कशासाठी गेली होती इस्त्रायलमध्ये 


टीममधील एका सदस्याने सांगितले की, नुसरत हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकरता गेली होती. हा सोहळा 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत होता. मात्र या युद्धामुळे सोहळा रद्द करण्यात आला. 



200 हून अधिक लोकांचा मृत्यू 


शनिवारी गाजापट्टीमध्ये आतंकवादी समूह हमास आणि इस्त्राईलवर यांच्यात युद्ध सुरू झालंय. ज्यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 लोकं जखमी झालीय. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून 5,000 हून अधिक रॉकेट डागले आणि सीमेजवळ अनेक इस्रायली सैनिकांनाही ताब्यात घेतले. यानंतर त्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.


पंतप्रधानांकडून युद्ध घोषित 


पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध घोषित केले. ते म्हणाले की, आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशनमध्ये नाही. हमासने इस्राईल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या साफ करण्याचे आदेश मी आधी दिले. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्यांनी कधीच विचार केला नसेल.