लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदबुद्धी गुपितामागे दडलेली आईची ती शेवटची आठवण
आपल्याला विनोदी लक्ष्या फक्त आणि फक्त त्यांच्या आईमुळे मिळाला.
मुंबई : घरात गरिबीची परिस्थिती, दुःख तरी कायम हसणारी आणि दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी. आज मी जे काही आहे माझ्या आईमुळे. तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो..' या मातेने आपल्याला विनोदी लक्ष्या दिला. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसोबत झालेल्या मुलाखतीत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या विनोदबुद्धी मागे दडलेलं गुपित जगासमोर आणलं. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील आणि प्रत्येकाला त्यापासून प्रेरणा मिळेल.
मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांना विनोद जन्मजात होता, की नंतर ही आवड निर्माण झाली असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर बेर्डे यांनी अत्यंत भावूक करणारं उत्तर दिलं. ते म्हणाले, 'आमच्या घरातली गरिबी, त्यामुळे असणारं दुःख, दुःख तर तिच्या चेहऱ्यावर कधीचं पाहिलं नाही, कायम हसरा चेहरा.. स्वतः हसत राहणारी दुसऱ्यांना हसवणारी अशी मझी आई..'
'त्यामुळे कायम ठरवलं दुःख कायम मनातल्या एका कोपऱ्यात ठेवायचं आणि कायम हसत राहायचं आणि दुसऱ्यांना हसवायचं...' आज जरी हा विनोदवीर आपल्यात नसला तरी त्यांचे विनोत आपल्याला पोट धरून हसवतात आणि ते विनोद आपले दुःख कमी करतात. मुलाखती दरम्यान बेर्डे यांनी त्यांच्या आईचा एक उत्तम दाखला दिला.
आईचं उदाहरण देत ते म्हणाले, 'आई आजारी होती, संपाचा दिवस होता. त्यामुळे कोणाची शस्त्रक्रिया होणार नव्हाती. तितक्यात माझ्या आईचं नाव उच्चारलं गेलं रजणी म्हणून... आम्ही आईला स्ट्रेचरवर बसलवलं. डॉक्टरांनी आत नेलं. तेव्हा आम्हाला विचालं तुम्ही कोणालं आणलं तर आम्ही म्हणालो, रजणी बेर्डे. तेव्हा डॉक्डर म्हणाले रजणी बेर्डे नाही तर रजणी शाह.
'त्यानंतर आई जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला अबॉर्शनसाठी नेलं होतं. तेव्हा कष्टी चेहऱ्यावरही आईने विनोद केला. म्हणाली विनोद फक्त तुलाचं येत नाही , तर सुशिक्षित लोक देखील विनोद करू शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने या जगाचा निरोप घेतला.' त्यामुळे आपल्याला हा विनोदी लक्ष्या फक्त आणि फक्त त्यांच्या आईमुळे मिळाला.