पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचा आमिर खानला होतोय पश्चाताप?
आमिर खानसाठी त्याची पहिली पत्नी रीनापासून वेगळं होणं सोपं नव्हते.
मुंबई : आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिला आहे. आमिरने 2005 मध्ये पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्यानंतर किरण रावशी लग्न केल्याचं सर्वांना माहिती आहे मात्र गेल्या वर्षी आमिर किरणपासूनही वेगळा झाला.
आमिर खानसाठी त्याची पहिली पत्नी रीनापासून वेगळं होणं सोपं नव्हते. आमिर खानने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 6' या चॅट शोमध्ये सांगितलं की, रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याला बराच काळ मानसिक आघात सहन करावा लागला होता.
रीनापासून वेगळे झाल्यानंतर आमिरला मानसिक आघात सहन करावा लागला होता.
आमिर खानने 2002 मध्ये रीना दत्ताला घटस्फोट दिला, जो त्याच्यासाठी आघातापेक्षा कमी नव्हता. करण जोहरच्या चॅट शोमध्ये आमिर म्हणाला, 'रीना आणि माझ्या लग्नाला 16 वर्षे झाली होती. जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी ते खूप वेदनादायक होतं. परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. वेगळं झाल्यानंतरही रीना आणि मी एकमेकांबद्दलचं प्रेम किंवा आदर कधीही कमी होऊ दिला नाही.
अभिनेता पुढे म्हणाला, 'मला तिच्या आयुष्यात येण्याची संधी दिल्याबद्दल मी रीनाचे आभार मानतो. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही खूप लहान होतो. याचा अर्थ असा नाही की मी रीनाचा आदर केला नाही किंवा माझं रीनावरचं प्रेम कधी कमी झालं आहे. ती खरोखरच एक अद्भुत व्यक्ती आहे. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही खूप लहान होतो. मी तिची कदर करतो आणि मला आनंद आहे की ती देखील करते. आमिरने असंही म्हणाला की रीना आणि किरण दोघांचे नेहमीच चांगले संबंध होते आणि त्यात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती.
आमिर खान आणि किरण राव यांची 2005 मध्ये लगन चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. दोघांना एक मुलगा आहे. गेल्या वर्षी आमिर आणि किरण राव यांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आमिर खान शेवटचा चित्रपट लाल सिंह चड्ढा मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र, आता त्याने काही काळ अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.