Flim Review `इत्तेफाक` : डबल मर्डर मिस्ट्री, खुर्चीत खिळवून ठेवणारा
चित्रपट दिग्दर्शन अभय चोपडा यांचा चित्रपट इत्तेफाक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहे.
मुंबई : चित्रपट दिग्दर्शन अभय चोपडा यांचा चित्रपट इत्तेफाक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहे.
हा चित्रपट ४८ वर्षी राजेश खन्ना आणि नंदा यांचा 'इत्तेफाक' पेक्षा वेगळा आहे. या चित्रपटाची निर्मिती बी आर चोपडा यांनी केली होती. आता बी आर चोपडा यांच्या नातू अभय चोपडा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. त्याने इत्तेफाक'द्वारे डेब्यू केला आहे.
चित्रपट : इत्तेफाक
फिल्म दिग्दर्शक : अभय चोपडा
कलाकार : सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा, अक्षय खन्ना
हा चित्रपट एक थ्रिलर मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटाला रेड चिलिज एंटरटेन्मेंट, धर्मा प्रॉडक्शन आणि बीआर स्टुडिओने प्रो़ड्यूस केला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याने ब्रिटनमधील सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठी याची भूमिका केली आहे. तर सोनाक्षी सिन्हाने माया सिन्हा आणि अक्षय खन्ना याने पोलीस अधिकारी देव वर्माची भूमिका केली आहे.
काय आहे कथा
मुंबई शहरात एका रात्री दोन खून होतात. एक विक्रम सेठीची पत्नी आणि दुसरा खून माया सिन्हाचा पती याचा होतो. पोलिसांनुसार या दोघांच्या खूनाला विक्रम कारणीभूत आहे. दुसरीकडे विक्रम आणि माया एकमेकांना खून म्हणतात. या हाय प्रोफाईल केसचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकारी देव वर्माकडे जबाबदारी देतात.
केवळ ३ दिवसात कोणतीही केस सॉल्व करणारा देव जस-जसा या डबल मर्डर मिस्ट्रीच्या मूळाशी जातो. तस-तशी ही केस अधिका कॉम्पिलकेटेड होत जाते. सत्य-असत्याच्या या खेळात देव सत्याचा शोध लावतो का, ही या चित्रपटाची कथा आहे...
कसा झाला अभिनय
एक सस्पेंस थ्रिलर चित्रपटात मजबूत कहाणीनंतर चित्रपटाला पुढे नेण्याचे काम कलाकारांचे असते. सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांनी ही जबाबदारी खूप छान निभावली आहे.
एक चाणाक्ष पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत अक्षयने खूप जबरदस्त काम केले आहे. सिद्धार्थ आणि सोनक्षी यांनी आपल्या अभिनयातून सस्पेंस कायम ठेवला आहे. दीड तासाचा हा चित्रपटात खूर्ची खिळवून ठेवणारा आहे. चित्रपट पाहून वाटत नाही की कोणत्याही प्रकारची घाई झाली आहे.