मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानचे नाव काही दिवसांपूर्वी लुलिया वेेंचर सोबत जोडले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लुलिया सलमान खानप्रमाणेच त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसोबत कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसली होती.  मात्र सलमान आणि लुलियामधील लव्हस्टोरी खुलण्याआधीच संपल्याची चिन्हं आहेत.


लुलिया आता तिच्या मायदेशी रोमानियामध्ये परतली आहे. ही माहिती लुलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.  लुलियाने फोटोखाली दिलेल्या कॅप्शननुसार तिचा व्हिसा संपल्याने तिला  मायदेशी परतण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 



 


३७ वर्षीय लुलीया ही सलमान खानची गर्लफ्रेंड असल्याची माहिती अनेक रिपोर्टमध्ये आली होती. मात्र दोघांनीही तसेच खान कुटुंबीयांनी याबाबत जाहीरपणे बोलणे टाळले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार लुलीयाला सलमान आणि कॅटरिनामधील जवळीक आवडत नव्हती. नुकताच सलमान आणि कॅटरिनाने 'टायगर जिंंदा है' चे चित्रिकरण संपवले आहे.