तापसी पन्नूला फॅनने पाठवले असे हटके `प्रपोजल`
बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या फॅन्सचे प्रेम अनेक स्वरूपात मिळते. आजकाल सोशल मीडियामुळे कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील संपर्क अधिक थेट झाला आहे. सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठे क्षण दिलखुलासपणे सोशलमीडियावर शेअर करतात.
मुंबई : बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या फॅन्सचे प्रेम अनेक स्वरूपात मिळते. आजकाल सोशल मीडियामुळे कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील संपर्क अधिक थेट झाला आहे. सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठे क्षण दिलखुलासपणे सोशलमीडियावर शेअर करतात.
तापसीला लग्नाचे प्रपोजल
तापसी पन्नू या अभिनेत्रीला तिच्या एका चाहत्याने ऑनलाईन प्रपोजल पाठवले आहे. तापसीच्या या क्रेझी फॅनने तिला लग्नाची मागणी घातली आहे. तापसीनंही ही मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
काय आहे लग्नाचे प्रजोजल
तापसी पन्नूला मजेशीर लग्नाचे प्रपोजल मिळाले आहे. त्यामध्ये लिहले आहे की, "बस आता आयुष्यात काय पाहिजे. " या सोबत त्याने #BestProposalever आणि #VegetarianLove असे हॅशटॅग वापरले आहेत.
खास मेसेज
तापसीला मेसेज पाठवताना फॅनने लिहलं होतं की. " हॅलो तापसी पन्नू, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का ? मी अविवाहीत आहे, दारू पीत नाही, शाकाहारी आहे, लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी तयार आहे." तापसीनेही या प्रपोजलला ट्विटरवर शेअर केलं आहे.
तापसीचा नवा चित्रपट
तापसी पन्नूचा 'दिल जिंदगी' हा चित्रपट नुकताच आला होता. साकिब सलीमसोबत तापसी झळकली होती. लवकरच तापसी 'मनमर्जीया' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत विक्की कौशल झळकणार आहे.