सध्या भारत आणि जगभरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या राजेशाही थाटातील विवाहसोहळ्याची (Ananat Ambani Radhika Merchant Marriage) चर्चा आहे. या लग्नासाठी तब्बल 5 हजार कोटी खर्च कऱण्यात आली अशी माहिती आहे. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची भेट घडवण्यात जावेद जाफरीचा (Jaaved Jaaferi) मुलगा मिजान (Meezan) याने महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा कमाल खानने (Kamal Khan) केला आहे. इतकंच नाही तर यासाठी अनंत अंबानीने मिजानला यासाठी 30 कोटींचं अपार्टमेंटही गिफ्ट केलं असा दावा आहे. जावेद जाफरीने मात्र हा दावा फेटाळला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टवरुनच कमाल खानला उत्तर दिलं आहे. 


कमाल खानचा दावा काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाल खानने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जावेद जाफरीचा मुलगा मिजान जावेद जाफऱी सध्या मुंबईच्या वांद्रे येथील संधू पॅलेसमध्ये वास्तव्यास आहे. कारण मुकेश अंबानीने त्याला 30 कोटींचं अपार्टमेंट गिफ्ट केलं आहे. खऱं तर मिजानने राधिका मर्चंटची अनंत अंबानीशी ओळख करुन दिली. काहीही होऊ शकतं".


जावेद जाफरीने मात्र लगेच हा दावा फेटाळून लावला. जावेद जाफरीने या पोस्टवर व्यक्त होताना, 'काहीही...'इतकंच लिहिलं आहे. यानंतर नेटकऱ्यांनीही कमाल खानला सुनावलं असून जावेद जाफरीच्या भावनांना ठेस पोहोचल्याचं म्हटलं. 'कमाल खान अद्यापही व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवतो,' असा टोला एकाने लगावला आहे. तर एकाने हा आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये काहीही बोलू शकतो अशी टीका केली आहे. 



मिजान हा अनंत अंबानीचा जवळचा मित्र आहे. महिनाभरातील सर्व लग्न सोहळ्यांमध्ये तो सहभागी होता. मिजानने 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये संजय लीला भन्साळी यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने चित्रपट निर्मात्याची भाची शर्मीन सेगलसह भन्साळी प्रोडक्शनच्या 2 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने गेल्या वर्षी 'हंगामा 2' (2021) आणि 'यारिया 2' मध्ये देखील काम केलं होतं. आता तो 'मिरांडा बॉईज'मध्ये दिसणार आहे. दरम्यान, जावेद शेवटचा 2022 मध्ये नेटफ्लिक्स इंडिया चित्रपट 'जादुगर'मध्ये दिसला होता.