मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या राष्ट्रामध्ये कोरोनामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. फक्त चीनमध्ये नाही तर संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सर्वसामान्य जनते बरोबरच सेलिब्रिटी देखील कोरोना व्हायरसमुळे चिंता व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅग यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या फक्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. खुद्द जॅकी चॅग यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी पूर्णपणे स्वास्थ्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर स्मितहास्य केलेला फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली. 



ते म्हणाले 'माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. बिलकूल घाबरू नका. मी आता क्वैरेंटाईनमध्ये नाही. आशा करतो तुम्ही देखील स्वास्थ्य असाल.' असं कॅप्शन त्यांनी स्वत:चा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं आहे. 


काही दिवसांपूर्वी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी मास्क भेट म्हणून पाठवले होते. ज्यासाठी त्यांनी चाहत्यांचे आभार देखील मानले. ते म्हणाले 'या कठीण समयी मला जगभरातून अनेक भेट वस्तू आल्या आहेत. मी माझ्या सहकार्यांना सांगितले की कोणत्याही अधिकृत संस्थांद्वारे या भेटवस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.' 


संपूर्ण जगात ६५ वर्षीय जॅकी चॅग यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अशा कठीण समयी ते ठिक आहेत की नाहीत याची कल्पना त्यांच्या चाहत्यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी आपण स्वास्थ्य असल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.