जॅकी श्रॉफची आई गेली, तरीही तिच्या मायेची ऊब तो नेहमी सोबत ठेवतोय...
सोबत असते आईची आठवण
मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) चर्चेत आहे. रविवारी सोनी टीव्हीवरील रिऍलिटी शो Indian Idol 12 मध्ये जॅकी श्रॉफ उपस्थित होते. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर आला. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यापासून जॅकी श्रॉफ यांच्या हातात (Jackie Shroff get emotional for his mother) एक कपडा होता. तो त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात स्वतःसोबत ठेवला होता. याचा खुलासा स्वतः जॅकीने कार्यक्रमात केला आहे.
या कारणामुळे जग्गू दादाच्या हातात असतो 'तो' कपडा
जॅकी श्रॉफ हा अतिशय भावूक अभिनेता आहे, याचा अनुभव अनेकांना आला आहे. जॅकी आपल्या आईच्या अतिशय जवळ होता. तो लहान असताना अनेकदा आईच्या पदराला धरून राहत असे. आई स्वयंपाक घरात काम करत असताना लहान जॅकी तिचा पदर धरून राहत असे.
आईच्या पदराची ऊब त्याला कायम हवी हवीशी वाटत असे. आज आई या जगात नाही. त्यानंतर जग्गू दादा कायमच आपल्या आईच्या साडीचा एक तुकडा कायमच सोबत ठेवतो. यामुळे आई कायमच आपल्यासोबत असल्याची जाणीव असते, असं ते म्हणाले. (जॅकी श्रॉफचा दिलदारपणा! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी पोहोचला सांत्वनाला)
आईच्या साडीची गोधडी शिवून जॅकी श्रॉफ ती वापरतात. यामुळे आईच्या मायेची ऊब जवळून अनुभवता येते असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. एवढंच नव्हे, तर जग्गू दादाचा हा विचार ऐकून सेटवर देखील अनेकजण आपल्या आईच्या साडीचा कपडा कायमच सोबत ठेवतात. जग्गू दादाने हा किस्सा स्वतः Indian Idol च्या कार्यक्रमात सांगितला.
जॅकी श्रॉफ हा माणूस वेगळा आहे. जॅकी श्रॉफ कायमच लहान मुलांवर प्रेम करतात. त्यांच्यात मला देव दिसतो, असं म्हणतं ते लहान मुलांच्या पाया देखील पडायला कमी करत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा India Idol च्या कार्यक्रमात आला.