मुंबई : अनिल कपूरला हे बॉलीवूडचा मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. त्यांना चिरतरुण अभिनेता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वयाच्या 65 व्या वर्षीही अनिल कपूर पूर्वी प्रमाणेच दिसतात. तसेच त्याचं अभिनय सगळ्यांनाच आवडतं. आज अनिल कपूर यांचा वाढदिवस आहे. अनिल कपूर आज त्यांच्या 65 वा वाढदिवस सजारा करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर स्टार्स आणि चाहते अनिल कपूरला शुभेच्छा देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा शेअर करणार आहोत, ज्यात अनिल कपूरला जॅकी श्रॉफकडून खूप कानशिलात खावी लागली होती. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऐवढं कानशिलात मारण्यासाठी अनिल कपूर यांनी स्वत:च मागणी केली होती.


शुटींगसाठी 17 कानशिलात खाल्ल्या


विनोद चोप्राच्या ‘परिंदा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक सीन शूट केला जात होता, ज्यामध्ये जॅकीने अनिल कपूरला कानशिलात मारली होती. जॅकीने कानशिलात मारली आणि दिग्दर्शकाने पटकन सीन ओके केला. पण अनिल कपूरला तो सीन फारचा आवडला नाही. त्यांनी जॅकीला सांगितले की, तू फार प्रेमाने मारतोस, जोरात मार आणि त्यांनी पुन्हा शॉट रेडी करायला सांगितला.



यावेळी अनिल कपूर यांचे म्हणणे ऐकत जॅकीने एकदा नव्हे, तर 17 वेळा जोरदार कानशिलात मारली, त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनिल कपूरचा यांचा चेहरा सुजला. पण अनिलला आनंद झाला की तो सीन त्यांच्या म्हणण्यानुसार शूट करण्यात आला.


2019 मध्ये या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने जॅकीने हा किस्सा शेअर केला होता. व्हिडीओमध्ये जॅकी आणि अनिल या चित्रपटाबाबत चर्चा करताना दिसत आहेत. सोबत अनुराग कश्यपही तेथे उपस्थीत होता. दोघांनीही या चित्रपटाशी संबंधित अशा कथांबद्दल बोलले, ज्याबद्दल चाहत्यांना फारसं काही माहिती नव्हतं.