मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ जग्गू दादा या नावाने प्रसिद्ध आहे. हीरो, तेरी मेहेरबानिया, कर्मा आणि राम लखन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जॅकी श्रॉफ आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. त्याचवेळी, अभिनेता त्याच्या आगामी 'बाप' चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफसोबत संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल दिसणार आहेत. दरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत आपल्या जुन्या मित्रांसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकत्र काम करणं म्हणजे कॉलेज रीयुनियनसारखं आहे.
जॅकी श्रॉफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, अनेक वर्षांनंतर ते त्यांचे जुने मित्र संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपटात काम करणार आहे. अभिनेता म्हणाला, 'मी जवळपास 30 वर्षांनंतर माझ्या सर्व मित्रांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. या चित्रपटात एकत्र काम करणं म्हणजे कॉलेज रियुनियनसारखं आहे. जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, 'मी संजय दत्तसोबत खलनायक, सनी देओलसोबत त्रिदेव आणि मिथुन दासोबत अनेक चित्रपट केले. त्यामुळे कॉलेज रियुनियनसारखं वाटतं. 'बाप' हा चित्रपट माझ्या खूप जवळ राहील, कारण या चित्रपटात मला माझे सर्व मित्र भेटले आहेत. यात  इमोशन, एक्शन आणि भरपूर मजा असेल.


'सिंघम अगेन'मध्ये जॅकी आपल्या मुलासोबत दिसणार आहे.
त्याचबरोबर जॅकी श्रॉफ त्यांचा मुलगा टायगरसोबत रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करण्याबाबत बोलले आहे. अभिनेता म्हणाला, 'सिंघम अगेन'मध्ये आमचा कोणताही सीन आहे की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या मुलासोबत एकाच फ्रेममध्ये काम करणं नेहमीच आनंददायी असेल. चित्रपटात हा सीन घडला तर ते ऐतिहासिक ठरेल. रोहित शेट्टीचं कौतुक करताना जॅकी म्हणाले की, तो नेहमीच अप्रतिम चित्रपट करतो आणि टायगरसोबत त्याची जोडी खूप चांगली आहे. अभिनेता म्हणाला की तो एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे ज्यामध्ये ते दोघंही 'बाप आणि मुला'च्या भूमिकेत असतील.


जॅकी श्रॉफ आपला मुलगा टायगर श्रॉफबद्दल बोलताना म्हणाले, 'मला वाटतं की, माझा मुलगा माझा वारसा पुढे नेत आहे. त्याने असंच पुढे जात राहावं. त्याला जे काही करायचे आहे. त्यात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही. टायगरने सर्वांचा आदर करणं, कामाचा आदर करणं आणि कोणाबद्दलही नकारात्मक न बोलणं शिकलं आहे. मी त्याला एवढंच सांगितलं आहे की, त्याने त्याचे काम करावे आणि चांगले आरोग्य ठेवावं.