Krishna Shroff Bold Photoshoot Goes Viral: अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक क्रिष्णा श्रॉफच्या बोल्ड फोटोशुटमुळे इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. क्रिष्णा श्रॉफ ही फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या इन्टाग्रामवरून बऱ्याचदा फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ टाकत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच तिनं स्विमिंग पूलमधला आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बिकीनी लुकमध्ये आहे. क्रिष्णाचे बिकीनीमध्ये हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.


क्रिष्णा इंडस्ट्रीतील सर्वात फिट सेलिब्रिटींपैकी एक आहे. लोकांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ती जगभर फिरत राहते. 


दिशा आणि क्रिष्णा जिवलग मैत्रीणी - 


क्रिष्णा ही दिशा पटानीची चांगली मैत्रीण आहे. दिशा ही तिच्या भावाची म्हणजेच टायगरची एक्स गर्लफ्रेंड आहे. तिने अलीकडेच त्या दोघींच्या मैत्रीबद्दल एक पोस्टही शेअर केली होती. 


एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले होते की दिशा आणि तिने खुप वर्षे एकत्र वेळ घालवला आहे. दिशा इंडस्ट्रीत येयच्या अगोदरच ती कृष्णाची जिवलग मैत्रीण होती. कृष्णाच्या मते त्या दोघी एकमेकींना नेहमीच आधार देतात. दिशाला ती कधीही फोेन करते आणि तेव्हा दिशा तिच्यासाठी नेहमीच तत्पर असते. बायका एकमेकींचे पाय ओढतात पण दिशा तशी नाही आणि मीही तशी नाही, अशी कबूलीही क्रिष्णाने दिली. 



क्रिष्णाने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंवर दिशा पटानीनेही कमेंट केली आहे. क्रिष्णा श्रॉफ सध्या तरी अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. परंतु लवकरच तिही चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याची शक्यता आहे.