जॅकलिनना २ मिनिटांच्या गाण्यासाठी एवढे पैसे...विश्वासच बसणार नाही
`साहो`तील सायको सय्या आणि इन्नी सोनी ही दोन गाणीही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार 'बाहुबली' प्रभासच्या चर्चा चांगल्याच जोर धरत आहे. चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलरला चाहत्यांकडून कमालीची दाद मिळत आहे. चित्रपटातील अनेक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यापैकी 'बॅड बॉय' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं सध्या तरूणांमध्ये चांगलचं गाजत आहे. या गण्यासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने २ कोटींच मानधन स्विकारलं आहे.
गायक बादशाह आणि गायिका निती मोहनच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेल्या 'बॅड बॉय' गाणं यूट्यूब चांगलाच ट्रेंड करत आहे. आतापर्यंत या गाण्याला १ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. या गाण्यामध्ये जॅकलिन-प्रभासची हॉट केमेस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
'साहो' चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. 'साहो'तील सायको सय्या आणि इन्नी सोनी ही दोन गाणीही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ यांनी केले आहे.
'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.