मुंबई : जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ED) समोर हजर झाली नाही. याआधी तिला एजन्सीने तिचे निवेदन नोंदवण्यासाठी दोनदा बोलावले होते. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी नीला पॉल मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. जॅकलीन फर्नांडिसला शुक्रवारी समन्स जारी करुन शनिवारी तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले होते, जरी ती शनिवारी पोहोचली नाही. पण तिने अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता जॅकलिन फर्नांडिसने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती अक्षय कुमार सोबत दिसत आहे. ती सांगत आहे की, ती ऊटीमध्ये 'राम सेतू' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. जॅकलिन फर्नांडिसने फोटो शेअर करताना लिहिले, 'राम सेतूच्या टीमसोबत येऊन छान वाटतंय.'


याआधी 30 ऑगस्टला जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ती या प्रकरणात साक्ष देत आहे. पीएमएलए अंतर्गत तिचा जबाब नोंदवला गेला आहे. नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, ती अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि ती तिची बाजू मांडत आहे. ती कोणत्याही प्रकारच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सामील नाही.


जॅकलिन फर्नांडिस एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते जे खूप वेगाने व्हायरल होतात. जॅकलिनने बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली आहे.