मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आरोपी बनवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईडी जॅकलिनविरोधात चार्जशीट दाखल करणार आहे. 200 कोटी वसुली प्रकरणात याआधीच जॅकलिनची चौकशी झालीय. पण आता पुन्हा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठग सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर आहे हे जॅकलिनला आधीच माहीत होते, असा विश्वास ईडीने व्यक्त केला आहे. जॅकलिन फर्नांडिसचे महाठग सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. 


आता ईडीने अभिनेत्रीवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. ईडी आज अभिनेत्रीविरोधात चार्जशीट देखील दाखल करणार आहे. त्यामुळे आता जॅकलिनला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 
 
ठग सुकेशने जॅकलिनला दिले कोट्यवधींचे गिफ्ट्स
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांचे गिफ्ट्स दिले आहेत. ईडीने अभिनेत्रीची 7 कोटींहून अधिकची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यात आलं आहे. 


कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. जॅकलिन सध्या ईडीच्या रडारवर आहे.