मुंबई : अनेक जण स्वप्नपूर्ण करण्यासाठी मुंबई शहराची वाट धरतात. या स्वप्नांच्या विश्वनगरीत प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात. पण एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपण नव्या स्वप्नाचा पाठलाग करतो. मुंबईत स्वतःचं  घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जॅकलिनने अभिनेत्री प्रियंका चोप्राचं घर विकत घेतलं आहे. जॅकलिनला स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 साली प्रियंका चोप्राने तिच्या लग्नाच्या वेळी घर खरेदी केलं होतं. आता हॉलिवूडमध्ये आपला मोर्चा वळवलेल्या प्रियंकाने तिचं जुनं घर जॅकलिनला विकलं आहे. याआधी जॅकलिन वांद्रे याठिकाणी भाडे तत्त्वावर राहत होती. प्रियंकाच्या जुन्या घरासाठी जॅकलिनने 7 कोटी रूपये मोजले आहे. 



मीडिया रिपोर्टनुसार जॅकलिनने जुहू याठिकाणी घर घेतलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती घराच्या शोधात होती. अखेर तिला तिच्या हक्काचं घर मिळालं आहे. त्यामुळे जॅकलिनचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. नवं घर घेतल्यामुळे जॅकलिन अत्यंत खूश आहे. 



जॅकलिनच्या कामाबाबतीत बोलायचं झालं तर, ती शेवटी शिरीष कुंद्राच्या 'मिसेस सीरियल किलर' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता जॅकलिन लवकरच  'बच्चन पांडे', 'भूत पुलिस' आणि 'सर्कस' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.