नवी दिल्ली : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने खास हॉट अंदाजात नववर्षाचे सेलिब्रेशन केले आहे. बार्ली येथे जॅकलिन नववर्षाचे सेलिब्रेशन करत आहेत. या ठिकाणाचे जॅकलिनचे काही खास फोटोज व्हायरल झाले आहेत. हे फोटोज तिच्या चाहत्यांना चांगलेच भावले आहेत. या फोटोजना सात लाखांवरहुन अधिक लाईक्स एका दिवसात मिळाले आहेत. 


1.6 कोटींहुन अधिक फॉलोअर्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी ही सुंदरी सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे इंन्स्टाग्रामवर 1.6 कोटींहुन अधिक फॉलोअर्स आहेत. 



लवकरच हॉलिवूडमध्ये लावणार वर्णी


‘हाऊसफुल’,‘जुडवा’, ‘रेस’ या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारी जॅक लवकरच हॉलिवूड सिनेमातही आपली वर्णी लावणार आहे.