Jacqueline Fernandez Money Laundering Case Hearing : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ( Jacqueline Fernandez ) कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. 200 कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचं नाव पुढे आलं आहे. त्यामुळे जॅकलिनवर अटकेची टांगती तलवार आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबतची जवळीक जॅकलिनला भोवली आहे. ईडीकडून ( Enforcement Directorate ) त्रास होत असल्याचा जॅकलिनने आरोप केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) जामिनावरील सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. यावेळी तिने ईडीवर काही आरोप देखील केले. आपल्यावरील आरोप तथ्यहिन असल्याचं तिने म्हटलं आहे. न्यायालय यावर आता उद्या निर्णय देणार आहे.


जॅकलिनला अटक का केली नाही - कोर्ट


न्यायालयाने ईडीला प्रश्न केला की, 'एलओसी जारी केल्यानंतर ही जॅकलिनला अद्याप अटक का केली नाही? तुम्ही निवडक लोकांना अटक का करत आहात?' ईडीने जॅकलिनच्या जामिनाला विरोध केला आहे. यावर उत्तर देताना ईडीने म्हटलं की, जॅकलिनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिने तपासात ही सहकार्य केलेले नाही.'


जॅकलिननं कोर्टात सांगितलं की, 'मी कामानिमित्त परदेशात जाते. पण मला परदेशात जाऊ दिलं जात नाही. मला आईला भेटायला जायतं होतं. पण तरी देखील जाऊ दिले नाही. याबाबत ईडीला मेल केला होता. पण त्यावर कोणतंही उत्तर आलं नाही.'


सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागड्या वस्तू गिफ्ट करत होता. ज्यामध्ये काही लाखो रुपयांच्या घोंड्याचा देखील समावेश आहे.