Jacqueline Fernandez Bedroom Video : बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ( jacqueline fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर ती लवकरच गौरी खानच्या ड्रीम होम शोमध्ये (dream home show) दिसणार आहे. शोचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघेही घराच्या इंटेरिअरबद्दल (Interior of the house) बोलताना दिसत आहेत. आतापर्यंत गौरी खानने (Gauri Khan) अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरिअर केलं आहे. आता गौरीने जॅकलिनच्या बेडरुमचं इंटेरिअर केलं आहे.  (jacqueline fernandez dance)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींच्या घराची रचना करणाऱ्या गौरी खानने जॅकलीनचा बेडरूमही (Jacqueline Fernandez Private Room) डिझाइन केला आहे. रुमची एक झलकही व्हिडीओमध्ये शेअर करण्यात आली आहे. त्याच वेळी,  गौरी खानच्या ड्रीम होम शोचा खास भाग 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (jacqueline fernandez interview)



व्हिडीओमध्ये जॅकलीनचा बेडरुम पांढऱ्या रंगात सजवण्यात आला आहे. ज्यामध्ये क्विन-साईझ बेड, टेबल शिवाय मोठी खिडकी देखील आहे. सध्या जॅकलिनच्या बेडरुमचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (Jacqueline Fernandez Private Room decor by Gauri khan )


आता जॅकलिन आनंदी असली तर, गेले काही दिवस अभिनेत्रीसाठी प्रचंड कठीण होते. मात्र आता महाठग सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याप्रकरणी जॅकलिनला जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार याकडे अभिनेत्रीच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.