मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोईंग देखील खूप मजबूत आहे. दरम्यान, तिने तिचं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा विचित्र अवतार पाहायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांना तिच्या चेहऱ्यापेक्षा त्यांच्या कपड्यांची जास्त काळजी वाटतेय. खरंतर तिने या फोटोंमध्ये फाटलेला ड्रेस घातला आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलिन फर्नांडिसने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करताना, एका युजर्सने 'मॅम तुमचा ड्रेस फाटलेला आहे' असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिलं आहे की, 'वडीलही फाटलेले कपडे घालतात'.



जॅकलिन फर्नांडिस अलीकडेच 'भूत पोलीस' या कॉमेडी हॉरर चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत यामी गौतम, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर मुख्या भुमिकेत दिसले होते. जॅकलिन लवकरच सलमान खान, रोहित शेट्टीच्या 'सर्कस' आणि बच्चन पांडेसोबत 'किक 2'मध्ये दिसणार आहे. जॅकलीन फर्नांडिस हाऊसफुल 3, रेस 3, ड्राइव्ह, रॉय आणि ब्रदर्स सारख्या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिसला 54.9 मिलीयनहून अधिक लोक फॉलो करतात.