मुंबई : ठगी सुकेश चंद्रशेखर विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणातील चौकशीच्या संदर्भात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस बुधवारी ईडीसमोर  हजर होणार आहे. या खटल्यात साक्षीदार म्हणून ती आपलं मत मांडणार आहे. या प्रकरणी ईडीने याआधीही जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत केली जाईल चौकशी 
जॅकलिनची ही चौकशी  दिल्लीतील एमटीएनएल इमारतीत होईल जिथे ईडीचं कार्यालय आहे. ती एका महिला अधिकाऱ्यासह अन्य पाच जणांसमोर तिचं म्हणणं नोंदवणार आहे.


एअरपोर्टवरही तासनतास चौकशी सुरू होती
बातमीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला 5 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी थांबवलं होतं. जेव्हा ती दिल्लीला जात होती. अधिकारी तिच्या विरुद्ध ईडीने जारी केलेल्या लुकआऊट सर्कुलरवर काम करत होते. कारण ती देशातून पळून जाण्याची भीती होती. मुंबई विमानतळावर तिची तासन्‌तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली.


सोमवारी पुन्हा बोलावलं
ईडीने तिला सोमवारी पुन्हा एकदा तपासात सहभागी होण्यासाठी समन्स बजावले आहेत. ईडीने शनिवारी 4 डिसेंबरला पीएमएलए कायद्यांतर्गत चार्टशीट सादर केलं होतं. ज्यामध्ये जॅकलिनसह काही बॉलिवूड कलाकारांना साक्षीदार म्हणून नामनिर्देशित केलं होतं.