मुंबई : बॉलिवूडची बबली गर्ल जॅकलिन फर्नांडीस सध्या रेस ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ सिनेमात तिने खास गाण्यावर नृत्य केले आहे.


जॅकलिनचा लूक आला समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९० च्या दशकातील सुपरहिट गाणे एक दो तीन... या गाण्यावर जॅकलिन थिरकणार आहे. माधुरीच्या बहारदार नृत्याने या गाण्याने प्रेक्षकांवर चांगलीच मोहिनी घातली होती. आता जॅकलिनचे नृत्य प्रेक्षकांचे लक्ष वेधणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण इतक्याच या गाण्यातील जॅकलिनचा लूक समोर आला आहे. लूकमधील खास फोटो शेअर करत तिने लिहिले की, एक दो तीन चार पांच... गाण्याची धूनने मी स्वतःला रोखू शकत नाही आहे... तर तयार व्हा... लवकरच येत आहे...



यांनी केले नृत्यदिग्दर्शन


माधुरीसाठी नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले होते. तर कोरियोग्राफर गणेश आचार्य आणि अहमद खान यांच्या स्टेप्सवर जॅकलिन थिरकणार आहे. यापूर्वीही रेस २ च्या लत लग गई आणि कीकच्या जुम्मे की रात या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन याच जोडीने केले होते.
गाण्यातील या लूकमध्ये जॅकलिन फार सुंदर दिसत आहे. 


३० मार्चला प्रदर्शित


टायगर दिशाचा बागी २ हा सिनेमा ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.