मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांच्या 'बागी 2' चित्रपटाची रसिकांना उत्सुकता आहे. टायगर आणि दिशा ही जोडी ऑन स्क्रीन आणि ऑन स्क्रीनदेखील चर्चेचा भाग आहे. त्यामुळे सहाजिकच या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 'बागी 2' हा चित्रपट 30 मार्च रोजी रीलिज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता तीन गाणी रसिकांच्या भेटीला आली आहेत. त्यापैकी सार्‍यांचे लक्ष वेधून घेणारे गाणे म्हणजे जॅकलीन फर्नांडीसचं एक,दोन,तीन... या गाण्याला 18 मार्च रोजी रीलिज करण्यात आले आहे. पण लोकांच्या मनात माधुरी दीक्षितची छाप पक्की बसली असल्याने जॅंकलीनच्या गाण्याला फारशी पसंती मिळालेली नाही. 


एक,दोन तीनचं रिक्रिएटेड व्हर्जन -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरी दीक्षित आणी एक दोन तीन... हे समीकरण इतकं प्रेक्षकांच्या मनात पक्क झालं आहे की या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनला प्रेक्षकांनी सकारात्मक दाद दिली नाही. 


'एक दोन तीन...' हे जॅकलीनचं व्हर्जन युट्युबवर हीट झालं. ट्रेडिंग आर्टिकलमध्ये हा व्हिडिओ युट्युबवर अव्वलस्थानी होता. माधुरीप्रमाणे जॅकलीनने गाण्याला न्याय दिलेला नाही अशाप्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी लिहल्या आहेत.


 



 



 



 




30 मार्चला रीलीज होणार चित्रपट 


माधुरी दीक्षितच्या गाण्याला सरोज खानने कोरिओग्राफ केले होतं तर अल्का याज्ञिकने गायलं होतं. जॅकलीनच्या रिक्रेटेड व्हर्जनला गणेश आचार्याची कोरिओग्राफी आहे तर श्रेया घोषालचा आवाज आहे. 'बागी 2'  चित्रपट 30 मार्चला रीलीज होणार असून साजिद नाडियाडवालाचे दिग्दर्शन आहे.