मुंबई : अतिशय महत्त्वाच्या आणि समाजातील दाहक वास्तवाला प्रकाशात आणणारं कथानक हाताळत काही दिवसांपूर्वी सूर्या स्टारर 'जय भीम' हा दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेकांच्या मनाचा ठाव घेणारा आणि विविधभाषी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलेला हाच चित्रपट सध्या मात्र एका नकारात्मक कारणामुळं चर्चेत आला आहे. (jai bhim Actor Suriya wife Jyothika and director Gnanavel faces legal trouble )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार अभिनेता सूर्या आणि त्याची पत्नी, ज्योतिका, चित्रपटाचे दिग्दर्शक Gnanavel यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितलं आहे. 


सूर्या आणि त्याच्या पत्नीची मालकी असणाऱ्या कंपनीकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली होती. पण, आता मात्र त्यात Vanniyar समुदायाचं चित्रण चुकीच्या पद्धतीनं केलं गेल्याची बाब अधोरेखित करत आता चित्रपटाच्या वाटेत अडथळे निर्माण केले गेले आहेत. 


खुद्द Vanniyar  समुदायातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेत चित्रपटातील काही दृश्यांमध्ये समुदायाला वाईट पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं सांगितलं. ज्यानंतर रुद्र वन्नियार सेनेनं कायद्याची मदत घेत सूर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शक Gnanavel यांच्या विरोधात कारवाईची पावलं उचलली. 


सदर प्रकरणीच्या सुनावणीदरम्यान निकाल देताना न्यायालयानं चित्रपटाशी संबंधित या तिनही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. अद्यापही सूर्यानं या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच त्याला लोकप्रियतेप्रमाणंच वादाचीही किनार होती. तेव्हा आता या चित्रपटाच्या या वादावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.