मुंबई : असे अनेक सिनेमे आहेत ज्यांच्यामाध्यमातून दिग्दर्शक, लेखक आणि इतर संबंधित व्यक्ती समाजातील वास्तव अगदी योग्य पद्धतीने पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न करतात. अशाचं सिनेमांधील एक सिनेमा म्हणजे  'जय भीम'. ऑटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. 'जय भीम' सिनेमात चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अडकवलं आणि त्याची मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. वास्तविक त्याचं पोलिसांनी चोरी केलेली असते. पण स्वतःचे आरोप लपवण्यासाठी गरिब आणि अशिक्षित व्यक्तींना कशाप्रकारे जाळ्यात अडकवलं, याचं उत्तम दिग्दर्शन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनात अनेक संकटांचा सामना केलेल्या पार्वती यांच्या अयुष्यावर सिनेमाची कथा फिरत आहे. तामीळ सुपरस्टार सूर्याच्या 'जय भीम' चित्रपटात त्यांची भूमिका सकारणाऱ्या पात्राचं नाव सेंगिनी असं आहे. सिनेमानंतर पार्वती यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते बालकृष्णन यांनी सूर्याला पार्वतीयांना मदत करण्याची विनंती केली.


त्यांनंतर सूर्या पार्वती यांना 10 लाखांची मदत केली. सूर्या त्यांना 10 लाख रूपयांचा चेक दिला आणि म्हणाला चेक बँकेत जमा करा. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पार्वती यांनी अनेक गोष्टी सांगितला. यावेळी पार्वती यांना 'जय भीम' चित्रपट पाहिला का? असं प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्यांनी अत्यंत भावुक करणारं उत्तर दिलं. 


पार्वती म्हणाल्या, 'माझ्या नातवंडांनी सिनेमा मोबाईलवर लावला. पण तो सीनेमा पाहू शकले नाही..' एवढंच नाही तर मी आता सर्व आशा सोडून दिल्या आहेत. माझ्या नवऱ्याचा जीव गेला आता तो सीनेमा पाहून मी काय करू...' असं देखील पार्वती म्हणाल्या.