Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?
Jailer Twitter Review: सध्या सोशल (Rajnikant Movie) मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाची. हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली आहे. तेव्हा चला तर पाहुया की ट्विटवर यावेळी प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Jailer Twitter Review: साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हटलं की डोळ्यासमोर पहिलं नावं येत ते म्हणजे रजनीकांत यांचे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांच्या 'जेलर' या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची चांगली क्रेझ निर्माण झाली आहे. रजनीकांत यांच्या फॅन्सनी अक्षरक्ष: थिएटरमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे. ट्विटरवर या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. रजनीकांत यांचे चाहते हे आपल्या चित्रपट पाहून झाल्यावर प्रतिक्रिया ट्विटरवर पोस्ट करायला सुरूवात केली आहे. रजनीकांत यांचा चित्रपट आला की प्रेक्षकांमध्ये तुडूंब गर्दी होयला लागते. रजनीकांत यांचे फॅन्स हे फक्त भारतातच नाहीत तर संपुर्ण जगात आहेत. तेव्हा हा चित्रपटही ओपनिंगला चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यातून आता 'जेलर'नं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यास सुरूवात केलेली आहे.
रजनीकांत यांच्यासोबत त्यांची एकतर हिरोईन ही चित्रपटांमध्ये असतेच असते. यावेळीही या चित्रपटातून आपल्याला तमन्ना भाटिया ही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. तमन्ना आणि रजनीकांत यांचे एक हटके गाणेही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहे. 'कव्वाल्ला' हे गाणंही खूप गाजते आहे. त्यातून या गाण्याचीही चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातूनही फॅमिली ड्रामा, फायटिंग, रोमान्स, मसाला, न्याय-अन्याय, हिरोईझम अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या ऑगस्ट महिन्यातील सुट्टीसाठी 'जेलर' हा चित्रपट रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की या चित्रपटावर ट्विटरवरून नक्की काय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
हेही वाचा - 'बालिका वधू' ते 'ससुराल सिमर का' प्रत्युषा बॅनर्जीच्या गाजलेल्या मालिका
'जेलर' या चित्रपटातून मल्ल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नाडा सुपरस्टार शिवा राजकुमार यांनी कोमियो रोल केला आहे. रजनीकांत यांच्यासोबत जॅकी श्रॉफ, राम्या क्रिशनन, तमन्ना, विनायकन अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाला अनिरूद्ध रविचंदेर यांनी संगीत दिलं आहे.
सध्या ट्विटवरवरून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकांनी या चित्रपटाचा क्लामॅक्स सर्वात बेस्ट असल्याचे म्हटलं आहे. त्यातून रजनीकांत यांच्या अभिनयाचीही सर्वांनीच तारीफ केलेली आहे. सोबतच हा चित्रपट परत परत पाहणार असेही अनेकांनी म्हटले आहे.