अभिनेत्रीला कोरोनाची लागण, सांगितली लक्षणं
जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
मुंबई : जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलेब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोने (olga kurylenko) हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ओल्गाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे तिने स्वत: एका रूममध्ये बंद करून घेतले आहे. तिने तिच्या घराच्या खिडकीतील एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'कोरोना व्हायरसचं निदान झाल्यामुळे मी स्वत:ला घरात बंद करून ठेवलं आहे. गेल्या अठवडाभरापासून मी आजारी आहे.' असं लिहिलं आहे.
त्याचबरोबर ताप आणि थकवा कोरोना व्हायरसचं मुख्य लक्षण असल्याचं सांगत तिने तिच्या आरोग्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्याचप्रमाणे तिने चाहत्यांना आपली काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोने पूर्वी अभिनेता टॉम हँक्स आणि अभिनेत्री रीटा विल्सन यांना देखील कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती.