मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. जान्हवी कपूर तिच्या लूक आणि स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जान्हवीही चाहत्यांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये जान्हवीचा हॉट लूक काही चाहत्यांना आवडला. तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, 'आज श्रीदेवी हयात असत्या, तर हे पाहून त्यांची प्रतिक्रिया काय असती?...' सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या बोल्ड फोटोंची चर्चा होत आहे. 



जान्हवीने इशान खट्टरसोबत 'धडक' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आता जान्हवी कपूर लवकरच 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' मध्ये दिसणार आहे.