मुंबई : 'प्यार हवा का एक झोका है, जो सब कुछ उडा कर ले जाता हैं...' दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'चांदनी' सिनेमातील हा डायलॉग... तो एक काळा दिवस आला आणि श्रीदेवी यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमी कानावर येताचं चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुली पूर्णपणे कोलमडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबत फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. कॅप्शनमध्ये जान्हवी म्हणते, 'मी तुझ्या शिवाय जेवढे वर्ष जगली आहे, त्यापेक्षा जास्त वर्ष तुझ्यासोबत मी राहिली आहे...'



पुढे जान्हवी म्हणते, 'मला याच एका गोष्टीचं वाईट वाटतं आणखी एक वर्ष तुझ्या शिवाय जगले आहे... तुला गर्व वाटेल असं काम आम्ही करू... अशी आशा करते.. हिच एक गोष्ट आहे, जी तुझ्याशिवाय आयुष्यात पुढे जाण्यासाठी दिशा देतेय...'


सध्या जान्हवीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 2018 साली दुबईत झाला. त्यांच्या निधनाने एकचं खळबळ माजली. आजही त्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही.