धडक लाँचदरम्यान जान्हवी-खुशीला आनंदाश्रू अनावर
दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करतेय.
मुंबई : दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या धडक सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करतेय. धडक सिनेमात जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षक, चाहते अत्यंत उत्सुक आहेत.
दोन वेगवेगळ्या वर्गातील जोडप्याची ही प्रेमकहाणी आणि त्यांचा संघर्ष आहे. जान्हवीचा हा पहिलाचा सिनेमा असला तरी तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. सैराटमध्ये दोन्ही प्रेमींना प्रेमाची किंमत जीव देऊन चुकवावी लागते. धडकमध्येही असेच होणार का?
श्रीदेवीची मुलगी जान्हवी धडक या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते. जान्हवीसाठी आजचा दिवस विशेष होता. यावेळी तिचे सगळे कुटुंबिय तिच्यासोबत होते. जान्हवीसोबत या ट्रेलर लाँचदरम्यान तिचे वडील बोनी कपूरशिवाय अनिल कपूर, संजय कपूर, हर्षवर्धन कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्य होते. या ट्रेलर लाँचदरम्यान जान्हवी आपल्या आईच्या आठवणीने भावुक झाली. यावेळी जान्हवी आणि खुशीला आनंदाश्रू आवरले नाहीत.
हा सिनेमा सैराट या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. इशान आणि जान्हवीचा हा सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होतोय.