स्वत:बद्दलच असं कोण बोलतं, या जान्हवी कपूरला काय झालंय?
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल सेन्ससाठीही खूप चर्चेत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल सेन्ससाठीही खूप चर्चेत असते. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम हँडलवर पाहिलत तर कळतं की, तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. पण अभिनेत्री जान्हवी जेव्हा करीना कपूर खानच्या लोकप्रिय चॅट शो व्हॉट वुमन वांटमध्ये पोहोचली तेव्हा तिने डेटिंग बाबतीत तिने स्वतः बद्दल मोठा खुलासा केला आहे.
खरं तर, करिना कपूर खानने तिच्या शोमध्ये जान्हवी कपूरला हा प्रश्न विचारला होता की, ''आजच्या पिढीमध्ये डेटिंग रोमान्ससाठी तरुणांकडे अधिक पर्याय आहेत का? त्याचा वाईट परिणाम होतो का?
या प्रश्नावर जान्हवी कपूरने सांगितलं की, तिने असे अॅप कधीच वापरलेले नाहीत. पण माझे असे अनेक मित्र आहेत. जे डेटिंग अॅप वापरतात ज्यामधून एकमेकांना ओळखतात, नवीन गोष्टी शिकतात. अभिनेत्रीने सांगितले की, यामुळे एक प्रकारचा मोकळेपणा आला आहे. जो चांगलाच आहे.
यानंतर करीना कपूर खानने जान्हवीला विचारलं की, 'व्हॉट वुमन वॉन्ट' हा शो महिलांचं प्रतिनिधित्व करतं, आजच्या डेटिंगच्या काळात मुली आता पूर्वीच्याच जवळ येत आहेत. मग काय? जान्हवीनेही याआधी डेटिंगसाठी कोणाशी संपर्क साधला आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देत जान्हवी कपूरने सांगितलं की, ती अशी कामं कधीच करू शकणार नाही. अभिनेत्रीने स्वत:ला फट्टू असं म्हटलं आहे. "मला फक्त हे लांबून बाघायला आवडतं.." पण हा अनुभव मी कधीही घेतलेला नाही.''