जान्हवी कपूरनं Rumoured Boyfriend ओरहानसोबतच्या रिलेशनशिपवर केलं वक्तव्य म्हणाली, `तो माझा...`
जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही गेल्या काही दिवसांपासून ओरहान अवत्रामणीसोबत (Orhan Awatramani) सतत एकत्र दिसत आहेत. त्यामुळे जान्हवी ही ओरहानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता या बातम्यांवर जान्हवीनं मौन सोडलं आहे. यावेळी ओरी तिच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे जान्हवीनं सांगितलं आहे.
पाहा काय म्हणाली जान्हवी
जान्हवी सध्या तिच्या 'मिली' या चित्रपटासाठी उत्सुक आहे. या निमित्तानं जान्हवी सगळीकडे चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या दरम्यान, न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनं चित्रपट आणि तिचा र्ह्युमर्ड बॉयफ्रेंड ओरहान विषयीही सांगितले. जान्हवीनं सांगितले की ओरी तिच्या खूप जवळचा आहे आणि तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. (janhvi kapoor talks on rumoured boyfriend orhan awatramani says he is a great guy)
या मुलाखतीत जान्हवीला ओरहानविषयी विचारले असता ती म्हणाली, 'मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो एका प्रकारे माझा सपोर्ट सिस्टीम आहे. जेव्हा तो माझ्या आजूबाजूला असतो तेव्हा घरात असल्यासारखं वाटतं. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. तो अशा मित्रांपैकी एक आहे जो नेहमीच मदतीसाठी उभा असतो. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो खूप छान माणूस आहे.'
दरम्यान, ओरी आणि जान्हवी हे बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. यूरोपमध्ये बवाल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ओरी हा जान्हवीसोबत दिसला होता. याशिवाय मिलीच्या स्क्रीनिंग दरम्यान, देखील दिसत आहे. एकीकडे ओरी आणि न्यासा यांचे देखील फोटो व्हायरल होत असतात. ते दोघेही चांगले मित्र आहेत. दिवाळी निमित्तानं ओरीनं न्यासासोबतचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते.