मुंबई : वरुण धवन आणि जान्हवी कपूर सध्या त्यांच्या नवीन चित्रपट 'बावला'मुळे चर्चेत आहेत. दोन्ही स्टार्स मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले.  ज्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यादरम्यान जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मात्र काही लोकांना तिची ड्रेसिंग स्टाईल आवडली नाही आणि उन्हाळ्यात जॅकेट घातल्याबद्दल तिला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूर एअरपोर्टवर स्पॉट
जान्हवी कपूर आणि वरुण धवन एअरपोर्टवर एकत्र दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. जान्हवी कपूर ब्लॅक कलरच्या आउटफिट्समध्ये ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीने क्रॉप टॉप घातला आहे. जो तिने मॅचिंग  ट्राउझरसोबत मॅच केला आहे. तिने वर लेदर जॅकेट घातलं आहे. यासोबतच तिने केस ओपन ठेवत तिचा लूक पुर्ण केला आहे. यासोबतच जान्हवी कपूरने हातात बॅग घेतली आहे. त्याचबरोबर वरुण धवन ग्रे कलरच्या स्वेटशर्ट आणि जॉगर्समध्ये दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांनी प्रचंड ट्रोल केलं
वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर वरुण धवन आणि जान्हवी कपूर 'दंगल' आणि 'छिछोरे' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित 'बावल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी युरोपला रवाना झाले आहेत. मात्र, जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरवर कमेंट करत लिहिलं की, 'एवढ्या उन्हात लेदर जॅकेट कोण घालतं'. तर दुसर्‍या एका यजर्सने कमेंट करत लिहीलं 'या उष्णतेत लेदर जॅकेट वाह रे वाह काय ही फॅशन ' अशी कमेंट केली. तर अजून एकाने लिहिलं, ' ईथे लोकं उष्णतेने मरत आहेत आणि तुम्ही जॅकेट घातलं आहात'.