नो मेकअप लूकमध्ये Janhvi Kapoor ने कोणा समोर टेकवलं डोकं; Video Viral
Janhvi Kapoor Viral Video: जान्हवी कपूर `या` ठिकाणी झाली नतमस्तक; नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेल उधाण
Janhvi Kapoor Viral Video : अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) 'धडक' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. फार कमी कालावधीत जान्हवीने झगमगत्या विश्वात स्वतःचं वेगळं स्थान पक्क केलं आहे. अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. ज्यामध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. सध्या सर्वत्र जान्हवीच्या नव्या व्हिडीओची चर्चा सर्वत्र रंगत आहे. (janhvi kapoor instagram)
व्हिडीओमध्ये जान्हवी मंदिरात देवाचं दर्शन घेताना दिसत आहे. पारंपरिक लूकमध्ये जान्हवी तिरुमाला मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. जान्हवीसोबत व्हिडीओमध्ये तिची मैत्रीण देखील आहे. व्हिआयपी रांगेतून दर्शन घेतल्यानंतर जान्हवी देवासमोर नतमस्तक झालेली व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
याआधी देखील जान्हवी अभिनेत्री सारा अली खान सोबत केदारनाथच्या दर्शनासाठी गेली होती. दोघींनी केदारनाथमध्ये प्रचंड मज्जा आणि देव पूजा केली. तेव्हा देखील दोन मैत्रींनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. जान्हवी कायम तिच्या मित्र परिवारासोबत बाहेर फिरायला जात असते.
जान्हवीच्या आगामी सिनेमाबद्दल ( janhvi kapoor movies) सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच 'मिली' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात पहिल्यांदा जान्हवीने वडिलांसोबत स्क्रिन शेअर केली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमा केला. (janhvi kapoor new movies)