मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेला धडक या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा या दोघांना एकत्रित पाहिले गेलेय. सिनेमात दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळालीये. अर्जुन कपूरने आपल्या ट्वीटमध्ये जान्हवी आणि इशान यांना मॉडर्न रोमियो-ज्युलिएट म्हटलंय. अर्जुन म्हणाला, धडकसाठी दोघांना ऑल दी बेस्ट. मी करण जोहर आणि शशांक खेतान यांचे आभार मानतो की ते दोघेही तुम्हाला एक मॉडर्न रोमियो-ज्युलिएट म्हणून सादर करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीने इशानसोबतचे काही कँडिड आणि इंटिमेट सीनमधील फोटो शेअर करताना म्हटलेय, इंटिमेट सीनदरम्यान पकडले गेलो. जान्हवी कपूरचा धडक हा सिनेमा मराठी सिनेमा सैराटचा रिमेक आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात  २० जुलैला रिलीज होतोय. सैराटमधील प्रसिद्ध गाणे झिंगाट हेही धडकमध्ये आहे