Janhvi Kapoor look: अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूरला तिची आई श्री देवी आणि वडील बोनी कपूर यांच्या नावाने ओळखले जात होते. पण कमी वेळातच तिनं बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा केली. आज तिला तिच्या सुपरहिट चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे ओळखले जाते. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आउटफिटविषयी बोलायचं झाल्यास तिचे कपडे हे बोल्ड असतात. तिचे लूक पाहून सगळेच वेडे झाले आहेत. (Janhvi wore a transparent dress Video came out mili nz)


हे ही वाचा - 2 वेळा संसार मोडल्यानंतर श्वेता करते हे काम... तिच्या आईकडून मिळाला तिला हा वारसा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नुकतीच अभिनेत्री दिवाळी पार्टीत डीप नेक जंपसूट परिधान करून पोहोचली होती, तर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री असा ड्रेस परिधान करून येत आहे की तिचा लूक पाहून तुम्हीही म्हणाल की जान्हवीच्या डोक्यात बोल्डनेस भरला आहे. पण अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या जान्हवीने असा खुलून दिसणारा ड्रेस परिधान केला की तोच तिच्या जीवावर बेतला. 


 




'मिली' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी कपूर मुंबईतील जुहूमध्ये सनी कौशलसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान, अभिनेत्रीने पापाराझींना पाहताच, तिने जबरदस्त पोझ दिली. याआधीही जान्हवी मुंबईत या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. 'मिली' चित्रपटात जान्हवीशिवाय सनी कौशल मुख्य भूमिकेत आहे. बोनी कपूर निर्मित आणि मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.