८ वर्षांनी असा दिसतो हा `छोटा कृष्ण`
२००८ मध्ये `जय श्री कृष्ण` या मालिकेत काम करणाऱ्या गोंडस कृष्णाचं साऱ्यांनीच भरभरून कौतुक केलं. आता हे बाळ कृष्ण मोठी झाली आहे.
मुंबई : २००८ मध्ये 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणाऱ्या गोंडस कृष्णाचं साऱ्यांनीच भरभरून कौतुक केलं. आता हे बाळ कृष्ण मोठी झाली आहे.
धृति भाटिया आता ११ वर्षाची झाली आहे. जेव्हा तिने श्रीकृष्णाची भूमिका साकारली तेव्हा ती फक्त अडीज वर्षाची होती. एवढंच नाही तर अनेक लोकं तिला खरा श्रीकृष्ण मानत होते. स्वतः धृतिने याबाबत खुलासा केला आहे... काय म्हणाली जाणून घ्या
धृति म्हणते की, शोच्यावेळी मी भरपूर लहान होते. मात्र मला एवढं चांगल आठवतंय की, लोकं अगदी भक्ती भावात सेटवर येत असतं. आणि महत्वाचं म्हणजे ते मला खऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे ट्रिट करत असतं. खरं सांगायचं तर आजही अनेक लोकं मला विचारतात की, खरंच तू श्रीकृष्ण नाहीस का? फेम आणि लोकप्रियतेबरोबरच त्या शोने मला भरपूर पॉझिटिव्ही दिली. ८ वर्ष झाली त्या मालिकेला, मात्र मी आजही इस्कॉन मंदिरात जाते. आठवड्यातून एकदा तरी मी भगवान कृष्णाच्या मंदिरात जाऊन आशिर्वात घेते.
कोरिओग्राफर व्हायचं धृतिला....
'जय श्री कृष्ण' या मालिकेनंतर धृति अनेक कर्मशिअल आणि 'डॉन्ट वरी चाचू' आणि '' इस प्यार को क्या नाम दूं' सारख्या अनेक छोट्या टीव्ही शोमध्ये तिने काम केलेलं आहे. आपल्या फ्यूचरबद्दल बोलताना धृति म्हणते की, 'मला कोरिओग्राफर व्हायचंय. माझी आई देखील कोरिओग्राफर आहे आणि मला त्यांच्या प्रमाणे बनायचं आहे.
सहावीत शिकतेय धृति
धृती आता सहावीत आहे. तिला फोटोग्राफी करणं. तसेच डान्सिंग आणि पेटिंग करण्याची आवड आहे. सध्या ती क्लासिकल डान्स शिकत आहे. धृतिचे वडील गगन भाटिया हे उद्योगपती असून आई पूनम कोरियोग्राफर आहे.