`राधा कृष्ण` मालिकेतील राधा खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश, फोटो पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्रीही होतील फेल, राधाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?
मुंबई : छोट्या पडद्यावरील राधा कृष्ण ही एक सुप्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेने अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडली आहे. ही मालिका पाहणार एक मोठा चाहता वर्ग आहे. मात्र चाहत्यांना या मालिकेतल्या राधा अर्थात मल्लिका सिंह खऱ्या खुऱ्या आय़ुष्यात कशी दिसते माहितीय का? नाही ना चला तर मग जाणून घेऊय़ात.
राधा कृष्ण मालिका 2018 मध्ये प्रसारित झाली होती. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या त्यागाची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेत सुमेध मुदगलकरने कृष्णाची तर मल्लिका सिंहने राधाची भूमिका साकारली होती. ही मालिका इतकी प्रेक्षकांना इतकी आवडली की या मालिकेने खूप टीआरपी मिळवला. मालिकेतील गाणी तसेच कथा आणि पात्रांनी चार चाँद लावले होते.
राधाच्या भूमिकेत असलेल्या मल्लिका सिंहची प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा होतेय. मात्र पारंपारिक वेशात दिसणारी राधा म्हणजेच मल्लिका सिंह खऱ्या खुऱ्या आयुष्यात खुपच स्टायलिश आहे.सोशल मीडियावर तिचे अनेक स्टायलिश फोटो आहेत. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियवर कधी ती क्रॉप टॉप घातलेली फोटो पोस्ट करते तर कधी स्कर्ट टॉपमध्ये दिसते. तिचा हा फॅशनेबल अवतार पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.
चाहत्यांच्या कमेंट काय?
एका चाहत्याने कमेंट करताना सांगितले की, या अवतारात तुम्हाला ओळखणे खूप कठीण आहे. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली की, तू बॉलीवूडलाही फेल करशील. तिचे चाहते फोटोवर तुफान कमेंटस करत आहेत.
मल्लिका सिंहने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'जय कन्हैया लाल की', 'ए सुटेबल बॉय', 'जानबाज सिंदबाद' यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये ती दिसली आहे. त्याचबरोबर आता चाहत्यांना तिला पुन्हा एकदा राधाच्या रुपात पाहायचे आहे.