Janmashtami 2022 : मीरेची कृष्णभक्ती आपण सर्वांनीच पाहिली, अनुभवली असेल. विविध मार्गांनी आपल्याला मीरा कळली. निस्सिम भक्तीचा मार्ग आपलासा करत प्रत्यक्ष आयुष्यातील सर्व प्रलोभनं त्यागत मीरेनं संपूर्ण जीवन कृष्णाच्या चरणी अर्पण केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरामातेच्या पावलावर अनेकांनीच पाऊल ठेवलं. कृष्णभक्तीत अशाच एका अभिनेत्रीनंही आपलं आयुष्य वाहण्याचा निर्णय साधारण वर्षभरापूर्वी घेतला. 'अनुपमा' या मालिकेतून नंदिनीच्या भूमिकेत झळकलेली ही अभिनेत्री म्हणजे अनघा भोसले (Anagha Bhosale). 


प्रसिद्धी, कलाविश्वात अनुभव सर्वकाही मिळत असताना अनघानं एकाएकी आयुष्य कृष्णभक्तीत वाहण्याचा निर्णय घेतला. ऐन तारुण्यात तिनं या मार्गाची निवड केल्याचं पाहून अनेकांनाच धक्का बसला. पण, तिनं पूर्णपणे चाहत्यांशी असणारं नातं तोडलं नाही. 




हरे कृष्ण म्हणत कृष्णाच्या सेवेत आयुष्य वाहिलं असतानाच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं हे नवं जगणं सर्वांसमोर आणलं. जिथे ती साक्षात नंदलालासाठी नैवेद्य बनवताना दिसली, कुठे गोशाळेमध्ये गायींची सेवा करताना दिसली, तर कुठे कृष्णाच्या (Lord shri krishna) नावाचा अविरत जप करताना दिसली. 


Janmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये?


 


जन्माष्टमीच्या निमित्तानंही अनघानं खास तयारी केली असून, आता ती या दिवशी काय वेगळं करते हे पाहण्याचीच उत्सुकता तिच्या फॉलोअर्सना लागून राहिली आहे. आयुष्याच्या एका वळणावर सर्वकाही अगदी सहजपणे मिळत असतानाच या साऱ्याचा त्याग करत अनघानं अनेकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं.