Viral Raja Mala Navari Pahije Japan Youtubers Dance Reel: हल्ली परेदशी प्रेक्षकांनाही मराठी गाण्यांची भुरळ पडलेली दिसते. 2016 मध्ये 'सैराट'च्या 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यानं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले होते. हे गाणं तेव्हा अक्षरक्ष: सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे या गाण्याची फारच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता तुम्ही पाहिलं तर 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील गाणं 'बहरला मधुमास'नंही चाहत्यांना वेड लावलं होतं. परदेशी कलाकारांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी या गाण्याचे रिल्स बनवले होते. हे गाणं देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाले होते. त्यामुळे या गाण्याची तूफान चर्चा रंगली होती. मध्यंतरी जपानी युट्यूबर्सनीही या गाण्यावर आपल्या पद्धतीनं रिल्स बनवले होते. आता अशाच एका जपानच्या कलाकारांनी 'राजा मला नववारी साडी पाहिजे' या गाण्यावर भन्नाट डान्स सादर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या इन्टाग्रामवर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एका जपानी कपलनं मराठी गाणं 'राजा मला नऊवारी साडी पाहिजे' या गाण्यावर रिल तयार केलं आहे. यावेळी हे रिल चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या रिलला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला असून त्यांचा हा डान्स पाहून प्रेक्षक भलतेच खूश झाले आहेत. @katekaku85 या अकांऊटवरून हे रील शेअर करण्यात आलं आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की नऊवारी साडी पाहिजे... लव्ह फ्रॉम जपान. सुरूवातीला हे कपल वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहे त्यानंतर गाणं सुरू झाल्यावर ते डान्स करतात आणि मग आधी व्हिडीओत डान्स करणारी महिला मग नऊवारीच्या वेशात येते आणि मग डान्स करणारा मुलगाही भारतीय वेशभुषेत येतो. या व्हिडीओला चक्क काही तासांमध्येच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावेळी महिला साडीत दिसते आहे तर मुलगा कुर्त्यामध्ये दिसतो आहे. 


हेही वाचा - सस्पेन्स, आणि थ्रीलर... कंगनाचा 'चंद्रमुखी 2' 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला..


सध्या सोशल मीडियामुळे सर्वकाही सोप्पं आणि जवळ आलं आहे. त्यामुळे एक व्हिडीओ व्हायरल होयलाही काही कालावधी पुरतो तेव्हा हल्ली असे व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या या व्हिडीओनंही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओला मराठी प्रेक्षकांनीही भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी आपली मराठी अस्मिता सातासमुद्रापार पोहचते आहे याचा आम्हाला फार गर्व वाटतो आहे असंही कमेंटमध्ये लिहिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका युझरनं लिहिलंय की, ''मनापासून आभार आमचा महाराष्ट्र जपानपर्यंत पोहोचवलात.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''आपली मराठी भाषा सातासमुद्रापार, अभिमान आणि गर्व आहे मी मराठी असल्याचा''. तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''महाराष्ट्र आपला भारीच आहे... सर्वांना वेड आहे आपल्या मराठी संस्कृतीचा.''