मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने 'बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन' जगासमोर आणलं आहे. या मुद्यावरून आता जोरदार चर्चा रंगली आहे. या मुद्यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी कंगनाने केलेल्या दाव्याला विरोध केला आहे तर काही जण कंगनाच्या या मुद्याशी सहमत आहेत. आता या विषयावर लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर बॉलिवूडमधील एक असं व्यक्तिमत्व आहे जे अनेक मुद्यांवर आपलं मत मांडत असतात. त्यांच्या मतांचा कायमच आदर केला जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत चर्चेत असलेल्या 'बॉलिवूड आणि ड्रग्स' संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. 


या मुद्यावर बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, सिनेसृष्टीतील ड्रग्सच्या वापरावर प्रतिबंध लावायला हवे आणि ड्रग्स ही समाजातील दुर्भावना आहे. ते म्हणाले की,'ड्रग्सवर बोलायचं झालं तर हे समाजातील दुर्भावना आहे. मी याबाबत फक्त ऐकलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी कधी ड्रग्स पाहिलेलं नाही. मी असं ऐकलं आहे की, तरूणांकडून याचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे.'



 दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन हा मुद्द चांगलाच गाजताना दिसत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान ड्रग्स प्रकरणामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंगचं नाव घेतलं. त्यानंतर रकुल प्रितने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी रकुल प्रीतचे नाव घेवू नये असे निर्देश माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसारमाध्यमांना द्यावे, असं या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.